Home / News / लाल कांद्याच्या दरात ८००-१००० रुपयांची घसरण

लाल कांद्याच्या दरात ८००-१००० रुपयांची घसरण

नाशिक – लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरात प्रति क्विंटल ८०० ते १००० रुपयांची घसरण झाली...

By: E-Paper Navakal

नाशिक – लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरात प्रति क्विंटल ८०० ते १००० रुपयांची घसरण झाली आहे. तर गेल्या आठवड्यात लाल कांद्याला प्रति क्विंटल ४ हजार ३००रुपये भाव मिळाला होता. आज त्याच कांद्याला सरासरी ३ हजार ५०० रुपये भाव मिळाला आहे.ढगाळ हवामानामुळे लागवड केलेल्या कांद्यावर करपा आणि बुरशीजन्य रोग लागत आहे. त्यावर महागडी औषधे मारावी लागतात. तर दुसरीकडे कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी दोन्ही बाजूने होरपळला जात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या