‘विप्रो’मध्ये नोकरकपात शेकडो कर्मचाऱ्यांना काढले

बंगळुरु –

देशातील महत्वाची आणि तंत्रज्ञान आणि आयटी कंपनी विप्रोने नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत कंपनी शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी विप्रोने सांगितले की, कंपनी त्यांच्या नफ्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे शेकडो मध्यम-स्तरीय कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याच्या प्रक्रियेत आहे.

भारतातील चार सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपन्यांमध्ये विप्रोचा हिस्सा सर्वात कमी आहे. डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत त्यांचा हिस्सा १६ टक्क्यांवर आला आहे. या तिमाहीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा वाटा २५ टक्के, इन्फोसिसचा २०.५ टक्के आणि एचसीएल टेक्नॉलॉजीचा वाटा १९.८ टक्के होता. यामुळेच विप्रोने नोकरकपातीचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत या महिन्याच्या सुरुवातीला संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना पाठवण्यास सुरुवात झाली होती. विप्रोच्या मुख्य वित्तीय अधिकारी अपर्णा अय्यर यांच्याकडे चालू तिमाहीत नफ्यात सुधारणा करण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विप्रोची ही नोकरकपात हा ‘लेफ्ट-शिफ्ट’ धोरणाचा एक भाग आहे. विप्रोकडून नोकरकपात करण्याची ही पहिलीच वेळ नाही. विप्रोने मार्च २०२३ मध्ये १२० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. त्याआधी कंपनीने सप्टेंबर २०२२ मध्ये ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top