Home / News / विरोधकांकडून विपर्यास! शहांचे विधान सकारात्मक! अशोक चव्हाणांचे वक्तव्य

विरोधकांकडून विपर्यास! शहांचे विधान सकारात्मक! अशोक चव्हाणांचे वक्तव्य

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य हे सकारात्मक आहे. विरोधकांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास केला असे वक्तव्य आज...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य हे सकारात्मक आहे. विरोधकांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास केला असे वक्तव्य आज भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी केले.
अशोक चव्हाण म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशात सर्वांना नितांत आदर आहे. भाजपा नेतृत्वालाही आदर आहे. गृहमंत्री शहा यांनी डॉ. आंबेडकरांची शिकवण व संविधानात त्यांनी जे काही नमूद केले आहे त्या सर्व गोष्टींची अंमलबजावणी केली तर देशात आमुलाग्र बदल घडेल या उद्देशाने विधान केले. मात्र, विरोधकांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास केला. त्यांच्याकडून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
दरम्यान, काल गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत विधान केले होते. ते म्हणाले की सध्या आंबेडकर, आंबेडकर म्हणण्याची फॅशन झाली आहे. एवढे देवाचे नाव घेतले असते, तर स्वर्ग मिळाला असता. यावरून आज संसदेत व राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ झाला.

Web Title:
संबंधित बातम्या