Home / News / व्यावनसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ

व्यावनसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ

मुंबई- सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला असून आजपासून मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ३९ रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून १,६९१ रुपयांना मिळणार आहे. ही दरवाढ फक्त व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्येच असणार आहे. घरगुती १४ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Web Title:
संबंधित बातम्या