शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. १८) बंद राहणार आहे. रावेत येथील जलउपसा केंद्रातील यंत्रणेची आवश्यक देखभाल दुरुस्ती करण्यात येणार असल्याने गुरुवारी सकाळी दहा ते सायंकाळी ६ दरम्यान जलउपसा केंद्र बंद राहणार आहे. यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. १९) देखील पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून, काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top