Home / News / शिवसेनेइतकीच मंत्रिपदे मिळावीत! छगन भुजबळांची मागणी

शिवसेनेइतकीच मंत्रिपदे मिळावीत! छगन भुजबळांची मागणी

नाशिक- अजित पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली. त्या बैठकीत स्ट्राइक रेटबाबतचा विषय निघाला. याबाबतीत राज्यात एक नंबरवर भाजपा आहे तर...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नाशिक- अजित पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली. त्या बैठकीत स्ट्राइक रेटबाबतचा विषय निघाला. याबाबतीत राज्यात एक नंबरवर भाजपा आहे तर दोन नंबरला आम्ही आहोत. तीन नंबरला शिंदेंची शिवसेना आहे. त्यामुळे स्ट्राइक रेट चांगला असल्याने शिवसेनेइतकीच मंत्रीपदे आम्हाला मिळावीत, अशी मागणी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का? यावर ते म्हणाले की, नवीन चेहऱ्यांना नेहमी संधी देण्यात येते. यावेळी जरा अडचण जास्त आहे, दर वेळी १६० आमदार असतात, यावेळी जास्त आमदार आहेत. सर्व पक्षांमध्ये नवे-जुने चेहरे येतील.
संभाव्य मंत्र्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातून छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ तुमचे नाव आहे का, याबाबत ते म्हणाले की, हे मी तुमच्याकडून ऐकतोय. मला देखील काही जणांनी नाव पाठवले, पण हे सगळे अंदाज आहेत. आमचे नेते अजितदादा आहेत. ते स्वतः फोन करून सांगतील तेव्हा ते खरे असेल. आमचे प्रांत अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष दिल्लीमध्ये आहेत. त्यांना इकडे बोलावण्याएेवजी दादाच दिल्लीला गेले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या