Home / News / शेअर बाजारातकिरकोळ वाढ

शेअर बाजारातकिरकोळ वाढ

मुंबई – भारतीय शेअर बाजार आज किरकोळ वाढीसह बंद झाला. आजचा दिवशी उलाढालींमध्ये स्मॉल कॅप कंपन्यांचा बोलबाला राहिला. स्मॉल कॅप...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – भारतीय शेअर बाजार आज किरकोळ वाढीसह बंद झाला. आजचा दिवशी उलाढालींमध्ये स्मॉल कॅप कंपन्यांचा बोलबाला राहिला. स्मॉल कॅप शेअर्समधील खरेदीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांक आतापर्यंतचा उच्चांकी स्तर गाठण्यात यशस्वी झाला.मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधील ३० पैकी ११ कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर १९ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.निफ्टीच्या ५० पैकी २१ कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर २९ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदविली गेली.बजाज फिनसर्व्ह (२.३७), मारुती सुझुकी (१.८७), एल अँड टी (१.६१), बजाज फायनान्स (१.३७), इन्फोसिस (१.११), सन फार्मा (१.०२), अॅक्सिस बँक (०.७४) आदि कंपन्यांचे शेअर्स वधारले. एचयूएल (२.०१) टक्क्यांनी तर टायटन (१.८९) या कंपन्यांचे शेअर्स घसरले.दिवसभराच्या उलाढालीनंतर सेन्सेक्स १४ अंकांनी वधारून ८१,७११ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ७.१५ अंकांच्या वाढीसह २५,०१८ अंकांवर बंद झाला.

Web Title:
संबंधित बातम्या