शेअर बाजारात तुफान तेजी सेन्सेक्स 560 अंकांनी वधारला

मुंबई – शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. सेन्सेक्स 560 अंकांनी वाढून 73,648 वर पोहोचला. निफ्टीने 189 अंकांची उसळी घेतली आणि 22,336 वर बंद झाला. बाजारात चौफेर खरेदी बँकिंग, फार्मा आणि वाहन क्षेत्रात झाली.

टॉप गेनर्समध्ये टाटा कंझ्युमर आणि बीपीसीएलचे शेअर्स तीन टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले, तर आयशर मोटर्स आणि लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स सुमारे तीन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. ॲक्सिस बँक 2.5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. शेअर बाजारात घसरण झालेल्या शेअर्समध्ये एनटीपीसी, एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज ऑटो, टाटा स्टील आणि इंडसइंड बँकेच्या शेअर्सचा समावेश होता.या तेजीमुळे कंपन्यांचे बाजार भांडवल आज सुमारे 4.80 लाख कोटी रुपयांनी वाढले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top