Home / News / शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी

मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. त्यामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले.मुंबई शेअर...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. त्यामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५९७ अंकांनी वाढून ८०,८४५ वर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १८१ अंकांनी वाढून २४,४५७ अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीमध्येही चांगली वाढ नोंदविली गेली. बँक निफ्टी ५८६ अंकांनी वाढून ५२,६९५ अंकांवर बंद झाला.
निफ्टीच्या पन्नास कंपन्यांपैकी अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, अदानी एंटरप्रायझेस, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. तर भारती एअरटेल, आयटीसी, हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी लाईफ, टाटा कंझ्युमर या कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली.

Web Title:
संबंधित बातम्या