Home / News / शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण

शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण

मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज सलग सहाव्या दिवशी घसरण झाली. दिवसभरातील अस्थिरतेअंती दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले.मुंबई शेअर...

By: E-Paper Navakal

मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज सलग सहाव्या दिवशी घसरण झाली. दिवसभरातील अस्थिरतेअंती दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११० अंकांनी घसरून ७७,५८० अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २६ अंकांच्या घसरणीसह २३,५३२ अंकांवर बंद झाला.बँक निफ्टीत मात्र वाढ झाली. बँक निफ्टी ९१ अंकांनी वाढून ५०,१७९ अंकांवर बंद झाला.आजच्या घसरणीत सेन्सेक्समधील ३० पैकी १७ कंपन्यांचे शेअर घसरले तर उर्वरित १३ कंपन्यांचे शेअर वाढीसह बंद झाले. त्याचप्रमाणे निफ्टीमधील ५० पैकी २९ कंपन्यांचे शेअर घसरणीसह तर उर्वरित २१ कंपन्यांचे शेअर वाढीसह बंद झाले.

Web Title:
संबंधित बातम्या