Home / News / शेअर बाजार घसरणीनंतर किरकोळ वाढीसह बंद

शेअर बाजार घसरणीनंतर किरकोळ वाढीसह बंद

मुंबई – शेअर बाजारासाठी आठवड्याचा आजचा शेवटचा दिवस फारसा उलाढालीचा ठरला नाही.आज बाजार उघडताच घसरण झाली.परंतु खालच्या स्तरावरून सावरल्यानंतर व्यवहार...

By: E-Paper Navakal

मुंबई – शेअर बाजारासाठी आठवड्याचा आजचा शेवटचा दिवस फारसा उलाढालीचा ठरला नाही.आज बाजार उघडताच घसरण झाली.परंतु खालच्या स्तरावरून सावरल्यानंतर व्यवहार एकाच पातळीत फिरत राहिले.मात्र असे जरी असले तरी किरकोळ का होईना वाढीसह बंद झाल्याने सलग सातवा दिवस शेअर बाजारासाठी वाढीचा राहिला.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सक्स ३३ अंकांनी वाढून ८१,०८६ अंकावर बंद झाला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११ अंकांनी वाढून २४,८२३ वर बंद झाला.बँक निफ्टी ५२ अंकांनी घसरून ५०,९३३ अंकांवर बंद झाला.दिवसभरात सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १७ शेअर्स वाढीसह तर १३ शेअर्स घसरणीसह बंद झाले.निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २१ शेअर्समध्ये वाढ तर २९ शेअर्समध्ये घसरण झाली.

Web Title:
संबंधित बातम्या