Home / News / संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारला

संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारला

मुंबई – रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ काल १०...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ काल १० डिसेंबर रोजी संपुष्टात आला.त्यानंतर कालच नवे गव्हर्नर म्हणून मल्होत्रा यांच्या नावाची घोषणा झाली होती.
मी रिझर्व्ह बँकेचा देदिप्यमान वारसा अबाधित राखेन. सर्व व्यवसायांना , सर्व नागरिकांना सातत्य आणि स्थैर्य आवश्यक आहे असे मला वाटते. आम्ही विश्वास,स्थैर्य आणि विकासाची परंपरा कायम राखू,अशी ग्वाही पदभार स्वीकारताना मल्होत्रा यांनी दिली.

Web Title:
संबंधित बातम्या