मुंबई- भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ जतमध्ये आयोजित सभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर शारिरीक व्यंगावरुन टीका केली. या टीकेवरुन शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार पलटवार केला.
जितेंद्र आव्हाड यांनी म्हणाले की, सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्यामुळे त्यांचा जबडा काढण्यात आलेला आहे. त्यांचे ऑपरेशन झाले, त्याच्या काही दिवसानंतर लगेच शरद पवार सभांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे तुम्ही काय बोलतो याची आपल्याला काही समज नाही का? महाराष्ट्र घडवण्यात तुमचा एक टक्का वाटा नाही. शरद पवारांचा शंभर टक्के वाटा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना बोलणे यावरून तुमची अक्कलशून्यता लक्षात येते. तुमची अक्कल धुळीला मिळालेली आहे. तुमच्या वडिलांची तुम्ही अशी टिंगल केली असती का? तुमच्या चेहऱ्यावर डाग पडला तर घरातून बाहेर पडणे मुश्किल होईल.

								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								







