सांताक्रुझच्या यशवंत नगरात गणेशोत्सवा निमित्त राम मंदिर

मुंबई – सांताक्रूझच्या यशवंतनगरमध्ये गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील राम मंदिरांची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यशवंतनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आमि शिवसेना शाखा क्रमांक ९१च यंदाचे ४० वे वर्ष असून यंदा मंडळाने भव्य राम मंदिर उभारून सांस्कृतिक आणि सामाजिक संदेश दिला आहे. राम मंदिर अतिशय कलात्मकतेने साकारण्यात आल्या आहे. खांबांवरील सुबक कोरीव आणि नक्षीकाम करण्यात आले आहे. त्यासोबत आकर्षक रोषणाईही आहे.या राम मंदिरात प्रभू रामाच्या अवतारात गणपती बाप्पाची मुर्तीही विराजमान होणार आहे. येत्या ६ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन होणार आहे. अयोध्येतील रामाची बालरुपातील मुर्ती अत्यंत आकर्षक अशीच आहे. या मूर्तीवर हिरेजडीत दागिने परिधान केलेले आहे. मंदिराचा प्रतिकृती ५० बाय २५ फूट आणि उंची ५० फूट आहे. मंदिरावर तीन मोठे कळस बसवण्यात आले आहेत. मंडळाने आतापर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाने अनेक बक्षिसे पटकाविले असल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष आणि आमदार संजय पोतनीस यांनी सांगितले.