साईराम बॅंकेच्या शाखा बंद ठेवीदारांची झोप उडाली

बीड :

जिल्ह्यात २० शाखा असलेल्या साईराम अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा अचानक बंद झाल्यामुळे या सोसायटीत ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. ही माहिती समजताच ठेविदारांनी मोठ्या संख्येने बँकेच्या समोर गर्दी केली.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जिजाऊ माँ साहेब पतसंस्था, परिवर्तन पतसंस्था आणि इतर काही पतसंस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याने बंद पडल्या आहेत. त्यात आता बीड शहरातील माळीवेस भागात मुख्य शाखा असलेल्या साईराम अर्बन या पतसंस्थेची भर पडली आहे.या पतसंस्थेच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा बंद झाल्या आहेत. त्यामुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आज खातेदारांनी पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर गर्दी केली होती. हजारो ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेवी या बँकेत आहेत. काही दिवसांपूर्वी असाच घोटाळा छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या आदर्श पतसंस्थेतदेखील झाला होता. नियमाबाह्य कर्ज वाटप प्रकरण आणि इतर प्रकरणात रिझर्व्ह बँकेकडून या पतसंस्थेवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top