Home / News / साखर हंगाम लांबल्याने गुळाची आवक वाढली

साखर हंगाम लांबल्याने गुळाची आवक वाढली

कोल्हापूर- यंदाचा साखर हंगाम लांबल्याने गुन्हाळांचे धुराडे लवकर पेटले आहे. यामुळे कोल्हापूर बाजार समितीत गुळाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे....

By: E-Paper Navakal

कोल्हापूर- यंदाचा साखर हंगाम लांबल्याने गुन्हाळांचे धुराडे लवकर पेटले आहे. यामुळे कोल्हापूर बाजार समितीत गुळाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. गुळाच्या दरात
तेजी असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे.

गुळाचा दर प्रतिक्विंटल ४७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.यंदा १५ नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.त्यामुळे गुऱ्हाळे जोमात सुरू आहेत.गेल्या तीन आठवड्यापासून जिल्ह्यातील बहुतांशी गुऱ्हाळे सुरू आहेत.गेल्या हंगामात १ एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ पर्यंत ६ लाख ९२ हजार ८७३ गूळ रव्यांची आवक झाली होती. तर, या हंगामात आतापर्यंत ७ लाख २२ हजार ४६६ रव्यांची आवक झाली असून गेल्या हंगामापेक्षा २९ हजार ५९३ गूळ रव्यांची आवक जास्त आहे.

Web Title:
संबंधित बातम्या