Home / News / समृद्धी महामार्गावरील अपघातात तिघे ठार

समृद्धी महामार्गावरील अपघातात तिघे ठार

बुलडाणा – मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर दिवाळीसाठी अमरावतीला जाणाऱ्या एका कुटुंबातील पती, पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. या अपघातात कारमधील...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

बुलडाणा – मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर दिवाळीसाठी अमरावतीला जाणाऱ्या एका कुटुंबातील पती, पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. या अपघातात कारमधील इतर दोघेजण जखमी झाले आहेत.पुण्यातील दाभाडे कुटुंब दिवाळी साठी पुण्याहून अमरावतीकडे कारने निघाले होते. यावेळी समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३३४ वर त्यांची भरधाव कार एका ट्रकला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की या कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारचालक व कुटुंबातील मुलगी जखमी झाली आहे. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या
Operation Tiger

Operation Tiger : मातोश्रीला पडलेल्या भगदाडावर एकनाथ शिंदेंची पहिली कडक प्रतिक्रिया!ते ६ टायगर शिवसेनेत आलेत, ना तुडवायला, ना आडवायला-आम्ही फक्त शिवसेना वाढवायला निघालोय’ म्हणत शिंदेनी टीकाकारांना सुनावले..