सातेरी केळबाय शांतादुर्गा देवस्थानचा १६ ला जत्रोत्सव

फोंडा – दक्षिण गोव्यातील श्री सातेरी केळबाय शांतादुर्गा देवस्थानचा आणि सुर्ला – सत्तरी वर्धापनदिन तथा जत्रोत्सव यंदा शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.त्यानिमित्ताने दिवसभर विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.”
यादिवशी देवतांची पूजा,वार्षिक सत्यनारायण महापूजा,आरती,तीर्थप्रसाद,भजन,सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्री पावणी तसेच केरी – सत्तरी यांचे दोन अंकी नाटक संगीत स्वामी समर्थ आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.तरी परिसरातील भाविकांनी या जत्रोत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शांतादुर्गा देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top