Home / News / सायन रेल्वेपूल वाहतुकीसाठी बंद

सायन रेल्वेपूल वाहतुकीसाठी बंद

मुंबई- बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. हा पूल ब्रिटिशकालीन म्हणजे ११२ वर्षे जूना असल्याने तो जीर्ण झाला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून हा उड्डाणपूल पाडून त्या जागी नवीन पूल बांधला जाणार आहे. जुलै २०२६ पर्यंत नवीन पुलाची निर्मिती पूर्ण होणार आहे. यामुळे वाहनचालकांना धारावीतील पुलावरून प्रवास करावा लागणार आहे.
मध्य रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयाने सायन रेल्वे स्थानकाजवळ सध्याच्या रेल्वेपुलाच्या (आरओबी) जागी नवीन पूल बांधला जाणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मुंबईने त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये आरओबी हटवण्याची आणि स्टील गर्डर्स आणि आरसीसी स्लॅबसह नवीन पूल बांधण्याची शिफारस केली होती.