Home / News / सिंधुदुर्गात मतदाना दिवशी सर्व आठवडी बाजार बंद !

सिंधुदुर्गात मतदाना दिवशी सर्व आठवडी बाजार बंद !

सिंधुदुर्ग- विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी मतदारसंघांत २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी जिल्ह्यातील ज्या ज्या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सिंधुदुर्ग- विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी मतदारसंघांत २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरविण्यात येतो त्या ठिकाणी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पडावे, याकरिता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतदानादिवशी भरविण्यात येणारा आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.

मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी दिले आहेत. यामध्ये देवगड तालुक्यातील मिठबांव, गिरगाव, वैभववाडी-शहर बाजारपेठ, कणकवली-कोळोशी, कुडाळ-शहर बाजारपेठ, मालवण-पोईप, मसदे, सावंतवाडी तालुक्यातील आरोस व वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यादिवशी भरविण्यात येणारा आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास अनुमती दिली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या