मुंबई-पुणे महामार्गावर अपघात! तिघांचा मृत्यू

मुंबई

मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने समोरील टेम्पो आणि चारचाकी गाडीला धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. या अपघातात गाडीमधील २ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण जखमी झाले. मृतांमध्ये ट्रकचालकाचादेखील समावेश आहे. तसेच ट्रकमधील २ जण आणि टेम्पोमधील ३ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ बचावकार्य सुरु करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. मात्र मदतकार्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top