Home / News / सीआयएससीईकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

सीआयएससीईकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली – कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई)ने काल इयत्ता १०वी व आयएससी १२वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई)ने काल इयत्ता १०वी व आयएससी १२वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. यावेळी सीआयएससीईने विद्यार्थ्यांना cisce.org या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड करण्याचा पर्याय दिला आहे. जाहीर वेळापत्रकानुसार, दहावी बोर्डाची परीक्षा १८ फेब्रुवारी ते २७ मार्च या कालावधीत पार पडेल. तर बारावी बोर्डाची परीक्षा १३ फेब्रुवारी ते ५ एप्रिल दरम्यान होईल. या पीडीएफमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक नियमावलीसुद्धा नमूद आहे. यामध्ये परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर दाखल व्हायचे आहे. तसेच परीक्षा केंद्रामध्ये कॅलक्युलेटर, मोबाईल फोन, ब्लूटुथ, इयरफोन व इतर इलेक्ट्रॉनिक साधनांसह परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या