Home / News / सुप्रिया सुळे यांची तब्येत बिघडल्याने दौरे पुढे ढकलले

सुप्रिया सुळे यांची तब्येत बिघडल्याने दौरे पुढे ढकलले

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर होत्या. पण त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर होत्या. पण त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे पुढील सर्व दौरे पुढे ढकलले आहेत. याबाबत एक्सवर पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, माझी तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांनी मला विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे मला माझा उद्याचा नियोजित दौरा नाईलाजास्तव पुढे ढकलावा लागत आहे. आजचा दौरा संपवून काही वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर उद्या त्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर पुढील दौऱ्याची तारीख कळवण्यात येईल.

Web Title:
संबंधित बातम्या