Home / News / हर्षवर्धन जाधवांच्या पराभवामुळे दोन कार्यकर्त्यांनी विष प्राशन केले

हर्षवर्धन जाधवांच्या पराभवामुळे दोन कार्यकर्त्यांनी विष प्राशन केले

कन्नड- विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. हर्षवर्धन जाधव यांचा झालेला दारुण पराभव जिव्हारी लागल्याने कन्नडमधील...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

कन्नड- विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. हर्षवर्धन जाधव यांचा झालेला दारुण पराभव जिव्हारी लागल्याने कन्नडमधील दोन तरुणांनी विष पित आत्महत्येचा प्रयत्न केला. कन्नड तालुक्यातील जामडी घाट येथे ही घटना घडली. सुनील रामदास शिरसाठ आणि आनंद वसंत जाधव असे विष प्राशन केलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. यातील एकावर कन्नड येथे, तर दुसऱ्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर हर्षवर्धन जाधव म्हणाले की, मी हात जोडून माझ्या सर्व हितचिंतकांना विनंती करतो, कृपया कुणीही असे पाऊल उचलू नका. कारण अभी पिच्चर बहोत सारा बाकी आहे. सगळे संपले आहे, असे समजू नका. अजून सुरुवातदेखील झालेली नाही. मला स्वत:ला विकावे लागले तरी विकेन, पण तुमच्या आशाआकांक्षा वाया जाऊ देणार असा शब्द देतो. आत्महत्येचा प्रयत्न, विष पिणे असे प्रकार करू नका.

Web Title:
संबंधित बातम्या