२९ वर्षीय प्रसिद्ध बॅाडीबिल्डर जोनासचा कोरोनामुळे मृत्यू

ब्राझिलिया
ब्राझीलमधील २९ वर्षीय प्रसिद्ध बॅाडीबिल्डर जोनास फिल्होचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तब्येत खराब झाल्याने जोनासला १५ एप्रिलच्या पहाटे ब्राझीलमधील सेरा राज्याची राजधानी फोर्टालेझा येथील साओ जोस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याला न्यूमोनिया आणि त्यानंतर कोरोना झाल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान काही फोटो त्याने सोशल मीडियावरुन शेअर केले होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. त्याला व्यावसायिक स्पर्धा करणारा सेरामधील पहिला बॅाडीबिल्डर म्हणून ओळखला जात होता. त्याने २०२३ साली मसलकॅान्टेस्ट रिओ प्रो स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्याने प्रशिक्षक म्हणून काम केले होते. जोनास फिल्होला श्रद्धाजंली वाहताना रिओ डी जनेरियोतील प्रशिक्षक मार्डेनेस कार्डोसो यांनी म्हटले की, एक योद्धा आपल्याला सोडून गेला आहे. तो महान बॅाडीबिल्डर होता. त्याने केलेली कामगिरी कायम स्मरणात राहिल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top