७०० डबलडेकर बसचा पुरवठा करण्यास कॉसिस कंपनीचा नकार

मुंबई

प्रशासनाने बसचा ताफा वाढविण्याच्या निर्णयांतर्गत फेब्रुवारी २०२२ मध्ये स्विच मोबॅलिटी कंपनी आणि कॉसिस कंपनीला डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्याचे कंत्राट दिले होते. स्विच मोबॅलिटी कंपनी २०० आणि कॉसिस कंपनी ७०० डबलडेकर बसेसचा पुरवठा करणार होती. मे २०२४ पर्यंत या बसचा पुरवठा करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते. मात्र आता ७०० डबलडेकर बसचा पुरवठा करण्यास कॉसिस कंपनीने नकार दिला आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील जुन्या डबलडेकर बसेसची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे. त्यामुळे स्विच मोबॅलिटी आणि कॉसिस कंपनी या दोन्ही कंपन्यांना प्रशासनाने ९०० एसी डबलडेकर बसेस पुरवठा करण्याचे कंत्राट प्रशासनाने दिले होते. स्विच मोबॅलिटी कंपनीने २०० पैकी ४९ डबलडेकर बसेसचा पुरवठा केला असून उर्वरित बसेसचा पुरवठा टप्प्याटप्प्याने होणार आहे. मात्र कॉसिस कंपनीने एकाही बसचा पुरवठा केला नाही. तसेच याबाबत प्रशासनाने कंपनीला वारंवार स्मरणपत्र देऊनही त्याकडे कंपनीने दुर्लक्ष केले. आता कॉसिस कंपनीने ७०० डबलडेकर बसचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या ३ हजार १० बसेस आहेत. हा ताफा वाढविण्यासाठी बेस्टने फेब्रुवारी २०२२ मध्ये तत्कालीन बेस्ट समितीत ७ हजार बस खरेदीचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता होती. मात्र ७०० डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्यास कॉसिस कंपनीने नकार दिला आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेल्या बसेसची संख्या अपुरी पडत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top