Home / News / कोकण, पुणे, साताऱ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट

कोकण, पुणे, साताऱ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट

मुंबई – भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department)आज आणि उद्या पालघर (Palghar), ठाणे (Thane), रायगड, रत्नागिरीसह सातारा व पुणे (Pune...

By: Team Navakal
Regional Meteorological Center,Mumbai
Social + WhatsApp CTA

मुंबई – भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department)आज आणि उद्या पालघर (Palghar), ठाणे (Thane), रायगड, रत्नागिरीसह सातारा व पुणे (Pune )घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर उद्या कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दक्षिण व मध्य भारताचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आहे. याशिवाय आज संपूर्ण गुजरात राजस्थानचा काही भाग , मध्य प्रदेश, संपूर्ण छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेशच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, पुढील २४ तासांत मुंबईसह उत्तर कोकण किनाऱ्यापासून पूर्वतर आणि पूर्वेकडील समुद्रावर कमी दाबाचा पट्टा असल्याने मुंबई ठाणे येथे ७० ते १३० मिलीमीटर पाऊस पडू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .प्रादेशिक हवामान केंद्रानुसार मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या