Home / दिनविशेष / National Bird Day: 5 जानेवारीला साजरा केला जातो राष्ट्रीय पक्षी दिन, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

National Bird Day: 5 जानेवारीला साजरा केला जातो राष्ट्रीय पक्षी दिन, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

दरवर्षी 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा केला जातो. एकेकाळी आपल्या आजुबाजूचा परिसर गजबजून टाकणारे पक्षी, सध्या वाढत्या काँक्रिंटच्या जंगलामुळे नामशेष...

By: E-Paper Navakal

दरवर्षी 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा केला जातो. एकेकाळी आपल्या आजुबाजूचा परिसर गजबजून टाकणारे पक्षी, सध्या वाढत्या काँक्रिंटच्या जंगलामुळे नामशेष होत चालले आहेत. पक्षांच्या संवर्धनाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो.

हा दिवस पर्यावरणातील पक्ष्यांचे महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाविषयी जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. लोकांना पक्ष्यांच्या सौंदर्याची, विविधतेचे महत्त्व पटवून देणे हा या दिवसाचा मूळ उद्देश आहे. लोकांना पक्ष्यांचे (National Bird Day) संवर्धन करणे, आणि त्यांच्या निवासस्थानांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.

2002 साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला दिवस

एव्हीयन वेल्फेअर कोएलिशनद्वारे 2002 मध्ये सर्वात प्रथम राष्ट्रीय पक्षी दिन (National Bird Day साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आली. पक्षांच्या नामशेष होणाऱ्या प्रजाती, त्यांचा अधिवास नष्ट होणे या गोष्टीकडे लक्ष वेधून घेणे हा याचा मूळ उद्देश होता. यावर्षीची राष्ट्रीय पक्षी दिनाची संकल्पना “Protecting Our Birds, Protecting Our Future” ही आहे.

राष्ट्रीय पक्षी दिन (National Bird Day) कसा साजरा करू शकता?

पक्ष्यांच्या संरक्षणाची गरज लक्षात घेऊन त्यासंदर्भात जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पक्षांच्या शेकडो प्रजाती नामशेष होत चालल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी काय उपाययोजना करायला हव्या, त्याची माहिती घ्यायला हवी. तसेच, पक्ष्यांची संरक्षणासाठी घरटी लावणे, त्यांच्यासाठी पाणी ठेवणे, झाडांची लागवड करणे आणि शिकार टाळणे गरजेचे आहे. पक्ष्यांचे संरक्षण जैवविविधता जतन करण्यासाठी आवश्यक आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या