Home / News / Nationwide Chemists’ Strike : देशव्यापी केमिस्ट बंद दुकानदारांचा पूर्ण प्रतिसाद

Nationwide Chemists’ Strike : देशव्यापी केमिस्ट बंद दुकानदारांचा पूर्ण प्रतिसाद

Nationwide Chemists’ Strike – ऑनलाईन औषधविक्री, भरमसाठ डिस्काऊंट, डॉक्टरांच्या चिठ्ठीकडे दुर्लक्ष करणे याविरुद्ध आज केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनांनी एक दिवसीय...

By: Team Navakal
Nationwide Chemists’ Strike
Social + WhatsApp CTA


Nationwide Chemists’ Strike – ऑनलाईन औषधविक्री, भरमसाठ डिस्काऊंट, डॉक्टरांच्या चिठ्ठीकडे दुर्लक्ष करणे याविरुद्ध आज केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनांनी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला होता. या संपाला दुकानदारांनी पूर्ण प्रतिसाद दिला. सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर बेमुदत संप करण्याचा इशारा आज देण्यात आला.


कर्नाटक, उत्तरप्रदेश, तेलंगणात संपाला प्रतिसाद मिळाला तर केरळ, गुजरात, सिक्कीम व इतर काही राज्यातील दुकानदारांनी विक्री सुरू ठेवण्याची लेखी हमी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेला दिली होती. महाराष्ट्रात मात्र बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला.
मुंबई, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, वर्धा, अहिल्यानगर, नागपूर अशा सर्वच जिल्ह्यात आज केमिस्ट दुकाने बंद होती.

सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. नागपूरच्या हुतात्मा संविधान चौकातून दुकानदारांनी मोर्चा काढत शहरातील सात हजार दुकाने बंद ठेवली. सोलापूर शहर व जिल्हा भागातील 4 हजार दुकाने आज बंद होती. केमिस्ट दुकानदारांनी सकाळीच सोलापूरच्या हुतात्मा चौकातून मोठा मोर्चा काढला. सांगलीतही 4200 दुकाने बंद होती. आजच्या बंदमुळे सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फटका बसला. सरकारी रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याने ते केमिस्टकडून औषधे आणायला सांगतात, मात्र आज केमिस्ट बंद असल्याने अडचण झाली.


केमिस्ट दुकानदारांचे म्हणणे आहे की, 2018 साली कोरोनाच्या काळात ऑनलाईन औषध विक्रीला परवानगी देणारा शासन आदेश निघाला. मात्र हा आदेश अजूनही लागू आहे. हा आदेश आता रद्द करावा. ऑनलाईन औषधविक्री करताना डॉक्टरचे प्रिस्क्रीप्शन नीट तपासले जात नाही हे धोकादायक आहे. शिवाय ऑनलाईन विक्रेते औषधांवर भरमसाठ डिस्काऊंट देतात हे रोखले पाहिजे. सरकारने आता आमच्या मागण्यांवर गंभीरपणे विचार करावा.


Web Title:
संबंधित बातम्या