Home / News / Sachin Ahir Daughter : पद उपकार म्हणून मिळत नाहीत’; वडिलांच्या समर्थनार्थ किरण अहिर मैदानात

Sachin Ahir Daughter : पद उपकार म्हणून मिळत नाहीत’; वडिलांच्या समर्थनार्थ किरण अहिर मैदानात

Sachin Ahir Daughter – उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाला सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केलेले माजी...

By: Team Navakal
Sachin Ahir Daughter
Social + WhatsApp CTA

Sachin Ahir Daughter – उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाला सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केलेले माजी मंत्री आणि आमदार सचिन अहिर यांच्या पक्षांतराची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्या मुलगी (Sachin Ahir Daughter)किरण अहिर हिने वडिलांच्या समर्थनार्थ एक भावनिक व्हिडिओ (Video Message) सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

सचिन अहिर यांच्या पक्षबदलानंतर सोशल मीडियावर (Social Media) त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप, टीका आणि प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर किरण अहिर हिने प्रथमच सार्वजनिकपणे भूमिका मांडत वडिलांच्या निर्णयामागील बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral) होत असून राजकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगली आहे.

‘मी राजकारणी म्हणून नाही, मुलगी म्हणून बोलतेय’

व्हिडिओमध्ये किरण अहिर म्हणाली की, “गेल्या काही दिवसांपासून माझ्या वडिलांविषयी सोशल मीडियावर अनेक आरोप, टीका आणि द्वेषपूर्ण संदेश पाहायला मिळत आहेत. मी येथे कोणाशी वाद घालण्यासाठी किंवा कोणाच्या विरोधात बोलण्यासाठी आलेली नाही. मी फक्त एक मुलगी म्हणून, लहानपणापासून जवळून पाहिलेल्या माझ्या वडिलांविषयीचा माझा दृष्टिकोन मांडण्यासाठी बोलत आहे.”

तिने सांगितले की, सध्या सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, “इतके सगळे मिळाले असताना त्यांनी पक्ष का बदलला?” मात्र या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी राजकारणाचा मूळ हेतू समजून घेणे आवश्यक आहे.

‘राजकारणाचा उद्देश सत्ता नव्हे, जनसेवा’

किरण अहिरने आपल्या व्हिडिओत राजकारणाच्या मूलभूत संकल्पनेवरही भाष्य केले. “राजकारणाचा खरा उद्देश केवळ पद, सत्ता किंवा प्रतिष्ठा (Power and Prestige) मिळवणे नसतो. जनतेची सेवा करणे हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. त्यामुळे एखाद्या राजकीय निर्णयाचे मूल्यांकन करताना त्यामागील परिस्थिती आणि त्या व्यक्तीचा संपूर्ण प्रवास समजून घेणे आवश्यक असते,” असे ती म्हणाली.

‘पक्षाने दिलेली पदे ही मेहनतीची पावती’

सचिन अहिर यांना पक्षाकडून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि पदे मिळाल्याची चर्चा होत असताना किरण अहिरने त्यावरही भाष्य केले. “अनेक जण म्हणतात की पक्षाने माझ्या वडिलांना खूप काही दिले. त्या मताचा मी आदर करते. मात्र एक प्रश्न विचारणेही महत्त्वाचे आहे. जर माझे वडील त्या जबाबदाऱ्यांसाठी पात्र नसते, त्यांनी अनेक वर्षे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केले नसते, तर त्यांच्यावर इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असत्या का?” असा सवाल तिने उपस्थित केला.

तिने पुढे म्हटले की, “पदे आणि जबाबदाऱ्या (Responsibilities) कुणालाही उपकार म्हणून दिल्या जात नाहीत. त्या कठोर परिश्रम, क्षमता, नेतृत्व आणि वर्षानुवर्षे कमावलेल्या विश्वासाच्या बळावर मिळतात. माझ्या वडिलांनी प्रत्येक जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली आहे.”

‘२०१९ मध्ये आदित्य ठाकरेंसाठी पक्ष बदलला’

व्हिडिओमधील सर्वाधिक चर्चेत आलेले विधान म्हणजे सचिन अहिर यांच्या २०१९ मधील पक्षांतराबाबत केलेला दावा. किरण अहिर म्हणाली, “माझ्या वडिलांनी २०१९ मध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासाठी पक्ष बदलला आणि त्यांना साथ दिली. त्यानंतर त्यांनी पूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने काम केले.”

या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेषतः ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

‘निर्णयामागील परिस्थिती समजून घ्या’

किरण अहिरने आपल्या व्हिडिओचा शेवट करताना लोकांना आवाहन केले की, कोणत्याही राजकीय निर्णयावर मत व्यक्त करण्यापूर्वी त्या व्यक्तीचा संपूर्ण प्रवास, त्याचे कार्य आणि निर्णयामागील परिस्थिती समजून घेणे आवश्यक असते.

दरम्यान, सचिन अहिर यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशानंतर ठाकरे गटाकडून टीकेची झोड उठवली जात असताना त्यांच्या मुलीने केलेले हे समर्थन सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे. येत्या काळात या व्हिडिओवरून आणखी राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


हे देखील वाचा –

एकनाथ शिंदे आजारी ! ठाण्यातील रुग्णालयात उपचार

 राम मंदिर देणगी चोरीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोडले मौन! कथित घोटाळ्याचा तीव्र निषेध; हिंदूंना केले ‘हे’ मोठे आवाहन

पंडवानीची सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन

Web Title:
संबंधित बातम्या