Home / News / मुक्तागिरीवर बैठक! शिंदेंच्या मंत्र्यांची निधी वाटपावरून नाराजी

मुक्तागिरीवर बैठक! शिंदेंच्या मंत्र्यांची निधी वाटपावरून नाराजी

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Dcm Eknath shinde)यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची (शिंदे गटाच्या) बैठक पार पडली. शिंदे गटातील...

By: Team Navakal
Dcm eknath shinde
Social + WhatsApp CTA

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Dcm Eknath shinde)यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची (शिंदे गटाच्या) बैठक पार पडली. शिंदे गटातील काही मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार (Dcm Ajit pawar)यांच्या नेतृत्वाखालील खात्यांकडून होणाऱ्या निधी वाटपात अन्याय होत असल्याबद्दल नाराज आहेत. निधी वाटप योग्य पद्धतीने न झाल्याने त्यांनी ही नाराजी बैठकीत व्यक्त केली. या नाराजीवर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी कुणालाही निधी कमी पडणार नाही, सर्वांना पुरेसा निधी दिला जाईल असे आश्वासन दिले.

या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबतही सविस्तर चर्चा झाली. तसेच, शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंत्र्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. पक्ष संघटनबळ वाढवण्यासाठी नियोजनात्मक पातळीवर मंत्र्यांची ठोस भूमिका ठरवण्यात आली. शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना आपली कामगिरी चांगली ठेवा, जनतेशी सातत्याने संपर्क ठेवा आणि पक्षसंघटन बळकट करा, असे आवाहनही केले.

Web Title:
संबंधित बातम्या