Home / Top_News / अमरावती जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेने काका-पुतण्या ठार

अमरावती जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेने काका-पुतण्या ठार

अमरावती – धामणगाव रेल्वे रेल्वे स्थानक परिसरात रात्री फिरायला गेलेल्या काकांना शोधताना पुतण्या आणि काका अचानक मागून आलेल्या रेल्वेच्या धडकेने...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

अमरावती – धामणगाव रेल्वे रेल्वे स्थानक परिसरात रात्री फिरायला गेलेल्या काकांना शोधताना पुतण्या आणि काका अचानक मागून आलेल्या रेल्वेच्या धडकेने ठार झाले. काल शुक्रवारी मध्यरात्री ११.४५ वाजण्याच्या ही दुर्दैवी घटना घडली.

या अपघातातील मृत काका-पुतण्याची नावे सुधाकर बन्सी तेलंगे (५५) व मंगेश नारायण तेलंगे (२८) रा. मोहम्मद पुरा अशी आहेत.सुधाकर तेलंगे हे रात्री अचानक बाहेर फिरण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडले होते. ते बराच वेळ परतले नाहीत म्हणून त्यांना शोधण्यासाठी मंगेश हा पुतण्या त्यांच्या मागोमाग गेला,त्याचवेळी भुसावळकडून नागपूरकडे जाणारी मालवाहतूक गाडी आली.या धडकेत हे दोघेही ठार झाले.सुधाकर हे बांधकाम कामगार होते. त्याच्यामागे पत्नी,तीन विवाहित मुली व दोन मुले असा परिवार आहे,तर अविवाहित असलेला मंगेश हा पेंटर काम करीत होता. त्याच्यावर दिव्यांग वडील, वृद्ध आई ,मानसिक आजारी असलेली बहीण व तिला असलेल्या दोन मुलीचा सांभाळ करण्याचा भार होता.

Web Title:
संबंधित बातम्या