Pranit More Controversy : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या एका कार्यक्रमातील विधानांमुळे सध्या सोशल मीडियावर प्रचंड वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमातील ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’चा मुद्दा आधीच तापलेला असताना, आता त्यात सहभागी झालेली डॉक्टर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सेजल पवार हिच्या एका धक्कादायक वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे. शवविच्छेदनादरम्यान मृतदेहाच्या संदर्भात केलेल्या एका अत्यंत आक्षेपार्ह आणि असंवेदनशील टिप्पणीमुळे डॉ. सेजल पवार यांच्यावर चौफेर टीका होत असून, आता या प्रकरणात पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
वैद्यकीय व्यवसायाला काळीमा फासणारे वक्तव्य आणि पोलिसांत गुन्हा
मुंबईतील प्रसिद्ध केईएम (KEM) रुग्णालयातील डॉक्टर सेजल पवार हिने वैद्यकीय शिक्षणादरम्यानचा (मेडिकल प्रॅक्टिस) एक अत्यंत वादग्रस्त किस्सा या शोमध्ये सांगितला. शवविच्छेदनाच्या (Post-mortem) वेळी ‘ॲनाटॉमी लॅब’मध्ये ती आणि तिची मैत्रीण मृतदेहांच्या गुप्तांगांच्या आकाराची आपापसात तुलना करायच्या, असे बेजबाबदार वक्तव्य डॉ. सेजल हिने जाहीरपणे केले. या विधानावर कॉमेडियन प्रणित मोरे यानेही हसून दाद दिली.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मृतदेहाच्या आणि वैद्यकीय व्यवसायाच्या अवमानाबद्दल नेटकऱ्यांनी तिच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. या वाढत्या दबावानंतर, अखेर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत डॉ. सेजल पवार हिच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या विविध कलमांतर्गत अधिकृत गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियावर कथित चॅट्स व्हायरल; दोन भारतीय क्रिकेटपटूंची नावे चर्चेत
या वादाच्या पार्श्वभूमीवर डॉ. सेजल पवार हिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या चर्चांनाही सोशल मीडियावर उधाण आले आहे. ‘रेडिट’ (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सेजलच्या कथित मित्रांचे काही वैयक्तिक चॅट्स, स्क्रीनशॉट्स आणि ऑडिओ क्लिप्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल चॅट्समध्ये दोन प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूंची नावे समोर आल्यामुळे क्रीडा वर्तुळातही खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. हे दोन क्रिकेटपटू भारतीय संघातील फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि आयपीएल स्टार आयुष बदोनी (Ayush Badoni) असल्याचे सांगितले जात आहे.
फसवणुकीचे गंभीर आरोप
व्हायरल झालेल्या या कथित चॅट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, डॉ. सेजल पवार हिने पृथ्वी शॉ आणि आयुष बदोनी या दोघांनाही वेगवेगळ्या कालखंडात डेट केले होते आणि त्यानंतर त्या दोघांचीही फसवणूक (चिट) केली. इतकेच नव्हे तर, चॅटमधील उल्लेखांनुसार, सेजलने केवळ या खेळाडूंचीच नाही, तर अनेक तरुणांची अशा प्रकारे आर्थिक किंवा भावनिक फसवणूक केली आहे. ती लोकांशी नाते जोडून त्यांचा वापर एखाद्या ‘टिश्यू पेपर’सारखा करते, असा गंभीर आरोपही या संभाषणात करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर आणि वादाने रौद्ररूप धारण केल्यानंतर डॉ. सेजल पवार हिने जाहीरपणे माफी मागितली आहे. मात्र, मृतदेहाचा अवमान केल्याचा कायदेशीर गुन्हा आणि वैयक्तिक आयुष्यातील वादग्रस्त दाव्यांमुळे तिच्यासमोरील अडचणी मात्र कमालीच्या वाढल्या आहेत.










