Home / Uncategorized / West Bengal Election 2026 : बंगालमध्ये मतदानाचा ‘महाविक्रम’; सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल ९०% मतदान, तामिळनाडूमध्येही मतदारांचा उत्साह

West Bengal Election 2026 : बंगालमध्ये मतदानाचा ‘महाविक्रम’; सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल ९०% मतदान, तामिळनाडूमध्येही मतदारांचा उत्साह

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदारांनी आज ऐतिहासिक गर्दी केली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत...

By: Team Navakal
West Bengal Election 2026
Social + WhatsApp CTA

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदारांनी आज ऐतिहासिक गर्दी केली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यामध्ये सुमारे ८९.९२% (जवळपास ९० टक्के) मतदानाची नोंद झाली असून, गेल्या अनेक वर्षांतील मतदानाचे सर्व विक्रम या निवडणुकीत मोडीत निघाले आहेत. केवळ बंगालच नव्हे, तर तामिळनाडूमध्येही मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या असून तिथेही विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.

पश्चिम बंगाल: उत्स्फूर्त प्रतिसाद आणि काही ठिकाणी तणाव-
पश्चिम बंगालमधील २९४ जागांपैकी पहिल्या टप्प्यात १५२ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. विशेषतः ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी अधिक राहिली आहे. दक्षिण दिनाजपूर, पश्चिम मेदिनीपूर आणि झाडग्राम या जिल्ह्यांमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाचा टक्का सर्वाधिक होता. काही ठिकाणी किरकोळ हिंसेच्या आणि वादाच्या घटना घडल्या असल्या, तरी निवडणूक आयोगाने चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

तामिळनाडू: दक्षिणेतही ‘बंपर’ मतदानाची लाट-
तामिळनाडूमध्येही आज विधानसभेच्या सर्व २३४ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. तिथेही सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ८२.२४% मतदान झाले आहे. तामिळनाडूमध्ये सत्ताधारी डीमके (DMK), अण्णाद्रमुक (AIADMK) आणि अभिनेता विजय याचा नवीन पक्ष ‘टीव्हीके’ (TVK) यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, अभिनेते रजनीकांत, कमल हासन आणि विजय यांसारख्या मान्यवरांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. उष्णतेचा तडाखा असूनही महिला आणि तरुण मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या