Vardhman Holdings Ltd : कापड उद्योगातील अग्रगण्य कंपनी

वस्त्रोद्योगात गेल्या ५० वर्षांपासून अग्रगण्य राहिलेली कंपनी म्हणजे वर्धमान होल्डिंग्स कंपनी. वर्धमान ग्रुपच्या अंतर्गत १९६२ साली या कंपनीची स्थापना झाली होती. व्हि.एस ओसवाल आणि श्री रतनचंद ओस्वाल यांनी पंजाबमधील लुधियाना येथे या कंपनीची स्थापना केली होती.

१९६५ साली या कंपनीकडून सूताचे सहा हजार बंडलचे उत्पादन घेतले जायचे. अगदी अल्प कालावधीतच या कंपनीने पंजाबमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. त्यानंतर १९८८ साली या कंपनीने स्टील क्षेत्रातही उडी मारली. हळूहळू या कंपनीने कापड उद्योगात पंजाबबाहेरही प्रगती करायला सुरुवात केली.

सध्या शेअर बाजारात अस्थिरता असली तरी या कंपनीचा शेअर ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहे. आज, २८ फेब्रुवारी रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत ३ हजार ४३५ रुपये आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या शेअरमध्ये १०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिल्याने अनेक गुंतवणूकदार या कंपनीकडे वळत आहेत. येत्या काही दिवसांत कापड उद्योगात मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या कंपनीकडून आणखी चांगल्या परताव्याची अपेक्षा आहे.

Scroll to Top