केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर; अखेर महागाई भत्त्यात १४ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली – केंद्र सरकारने अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १४ टक्क्यांनी वाढ केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महागाई भत्ता वाढणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. महागाई भत्ता वाढल्याने साहजिकच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. मात्र या वाढीचा फायदा फक्त केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSEs) मधील कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे.

याआधी केंद्रीय कर्मचार्यांना १७० टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता त्यात वाढ होऊन १८४ टक्के झाला आहे. गेल्या 18 महिन्यांपासून लटकलेल्या डीए थकबाकीबाबत बोलायचे झाले तर, सध्या तरी थकबाकी देण्याची सरकारची कोणतीही योजना नसल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. मात्र मार्चमध्ये होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतची कर्मचाऱ्यांची थकबाकी सरकारने दिलेली नाही. ज्यांची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. जेसीएमच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, लवकरच जेसीएमची डीओपीटी आणि वित्त मंत्रालय, खर्च विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक होणार आहे. ज्या यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

Scroll to Top