Home / News / साताऱ्यात सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण स्फोट

साताऱ्यात सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण स्फोट

सातारा- साताऱ्यातील माची पेठ येथील मोटार सर्व्हिसिंग सेंटरमध्ये आज भीषण स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर २ जण...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सातारा- साताऱ्यातील माची पेठ येथील मोटार सर्व्हिसिंग सेंटरमध्ये आज भीषण स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुनीर पालकर (३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. वाहनात गॅस भरत असताना हा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरून गेला, तर आजूबाजूच्या घरांना तडे गेले.

Web Title:
संबंधित बातम्या