Home / News / नाशिकमध्ये पारा घसरला मोसमातील तापमानाची नोंद

नाशिकमध्ये पारा घसरला मोसमातील तापमानाची नोंद

नाशिक – नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. काल १४ अंशापर्यंत खाली आलेले किमान तापमान आज १३.७ अंश...

By: E-Paper Navakal

नाशिक – नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. काल १४ अंशापर्यंत खाली आलेले किमान तापमान आज १३.७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. किमान तापमानाचा पारा आता वेगाने घसरण्यास सुरुवात झाल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यात किमान तापमान तर थेट १२ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद करण्यात आली.मागील तीन दिवसांपासून शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरत आहे. महाबळेश्वर पेक्षाही कमी किमान तापमानाची नोंद सध्या नाशिकमध्ये होत आहे. गेले दोन दिवस राज्यात सर्वाधिक निच्चांकी तापमान नाशिकमध्ये नोंदवले गेल्याची नोंद आहे.

Web Title:
संबंधित बातम्या