Home / News / गायक मुकुंद फणसळकर कालवश

गायक मुकुंद फणसळकर कालवश

पुणे – मराठी संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांनी आज पुण्यात प्राणज्योत मालवली. फणसळकर यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे – मराठी संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांनी आज पुण्यात प्राणज्योत मालवली. फणसळकर यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान मुकुंद फणसळकर यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमातून फणसळकर घराघरात पोहचले होते. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. तर त्यागराज खाडिलकर यांनीही जवळच्या मित्रासाठी भावुक पोस्ट शेअर केली.

Web Title:
संबंधित बातम्या