Home / News / रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षेसाठी नांदेड ते तिरुपती विशेष गाडी

रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षेसाठी नांदेड ते तिरुपती विशेष गाडी

नांदेड – रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने उद्या हुजूर साहिब नांदेड ते तिरूपती दरम्यान एक विशेष ट्रेन सोडण्याचा...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नांदेड – रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने उद्या हुजूर साहिब नांदेड ते तिरूपती दरम्यान एक विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या नियोजनानुसार गाडी क्रमांक ०७१०५ हुजूर साहिब नांदेड ते तिरूपती विशेष गाडी नांदेड येथून उद्या दुपारी दुपारी सव्वा बारा नांदेड स्थानकातून सुटणार आहे. ही गाडी मुदखेड,धर्माबाद, निझामाबाद,कामारेड्डी, काचेगुडा,महबूबनगर, गडवाल,करनुल टावून, ढोणे,अनंतपुर, धर्मावरम, कंदिरी,मदनपल्ले रोड, पिलेर,पाकाला मार्गे तिरूपती येथे दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६.२५ वाजता पोहोचेल. ही गाडी तिरूपती येथून २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३५ वाजता परतीच्या प्रवासासाठी सुटेल.

Web Title:
संबंधित बातम्या