PM Kisan Samman Nidhi Yojana | केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेतून (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट खात्यात जमा केली जाते. देशभरातील कोट्यवधी लघु आणि सीमांत शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.
सध्या शेतकरी 20 व्या हप्त्याची (PM Kisan 20th installment) प्रतीक्षा करत आहेत. यापूर्वी 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते जारी करण्यात आला होता. त्या आधारे, पुढील हप्ता जून 2025 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.
ऑनलाईन स्टेटस कसे तपासाल?
तुमचे नाव योजनेच्या यादीत आहे की नाही आणि पुढील हप्त्यासाठी पात्रता आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
- pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर “Know Your Status” या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा Registration Number टाका.
- दिलेला Captcha Code भरा.
- “Get Detail” वर क्लिक केल्यानंतर स्टेटस स्क्रीनवर दिसेल.
कोण पात्र आणि कोण अपात्र?
केवळ ज्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण आहे आणि माहिती योग्य प्रकारे व्हेरिफाय झाली आहे, अशा शेतकऱ्यांनाच हप्ता मिळतो. जर ई-केवायसी (e-KYC) किंवा भूलेख सत्यापनपूर्ण झाले नसेल, तर तुमचा हप्ता थांबू शकतो. त्यामुळे या सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.