विठूरायाच्या चंदन उटी पूजेतून मिळाले ३५ लाख

andan Uti ritual of Vitthal-Rukmini temple

पंढरपूर– गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या चंदन उटी पुजेची (The Chandan Uti ritua)सांगता काल करण्यात आली.दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्र सुरू होईपर्यंत दररोज दुपारी पंढरीच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या (Vitthal-Rukmini temple) चंदनउटी पूजा करण्याची परंपरा आहे. या वर्षी चंदनउटी पुजेतून मंदिर समितीला ३५ लाख रुपयांचे उत्पन्न (income of ₹35 lakh) मिळाले.

ग्रीष्म ऋतूतील कडाक्याच्या उन्हापासून विठुरायाला आणि माता रुक्मिणीला थंडावा लाभावा या भावनेतून चंदनउटी पूजा केली जाते. या दोन्ही मूर्तीच्या चंदनउटी पुजेची सांगता काल चंदनउटी पुजा सदस्या अ‍ॅड. माधवीताई निगडे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते झाली.यंदा प्रथमच श्रींची चंदनउटी पूजा ऑनलाईन पध्दतीने बुकींग करण्याची सोय केली होती. त्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सांगता समारंभानिमित्त श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये विशेष भोजन व्यवस्था करण्यात आली होती.