शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडशी भिडणार, कुठे पाहाल सामना? जाणून घ्या कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

India England Test Series Schedule

India England Test Series Schedule | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 च्या नव्या सायकलला सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ (Team India) आपल्या या स्पर्धेला इंग्लंडविरुद्धच्या (India England Test Series) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेने सुरुवात करणार आहे.

20 जून 2025 पासून लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर दोन्ही संघामध्ये पहिला सामना खेळला जाईल. या मालिकेत भारतीय संघाची कमान कर्णधार शुभमन गिलच्या हाती असेल.

रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर शुभमन गिलला भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. गिलसाठी ही पहिलीच कसोटी मालिका आहे, जिथे तो कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करेल. याशिवाय, विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने भारतीय संघाला त्याच्याशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे. ऋषभ पंतला उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय, जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक (India England Test Series Schedule)

पाच सामन्यांची ही कसोटी मालिका 20 जून ते 31 जुलै 2025 दरम्यान खेळली जाईल. सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) दुपारी 3:30 वाजता सुरू होतील. खालीलप्रमाणे आहे संपूर्ण वेळापत्रक:

  • पहिली कसोटी: 20 जून, हेडिंग्ले, लीड्स
  • दुसरी कसोटी: 2 जुलै, एडजबॅस्टन, बर्मिंगहॅम
  • तिसरी कसोटी: 10 जुलै, लॉर्ड्स, लंडन
  • चौथी कसोटी: 23 जुलै, एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
  • पाचवी कसोटी: 31 जुलै, केनिंग्टन ओव्हल, लंडन

कोठे पाहता येतील सामने?

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर (Sony Sports Network) उपलब्ध असेल. याशिवाय, चाहते JioHotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतात.

भारतीय आणि इंग्लंड संघ

भारताचा कसोटी संघ: शुभमन गिल (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, यशस्वी जयस्वाल, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.

इंग्लंडचा कसोटी संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), बेन डकेट, जो रूट, झॅक क्रॉली, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, ख्रिस वोक्स, ऑली पोप (यष्टीरक्षक), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), सॅम्युअल जेम्स कूक, ब्रायडन कार्स, शोएब बशीर, जोश टंग, जेमी ओव्हरटन.