Home / arthmitra / SIP Investment Tips: वयाच्या 21 व्या वर्षी सुरू करा ‘हा’ प्लॅन, 30 वर्षांनंतर मिळतील 15 लाख

SIP Investment Tips: वयाच्या 21 व्या वर्षी सुरू करा ‘हा’ प्लॅन, 30 वर्षांनंतर मिळतील 15 लाख

SIP Investment Tips: पैसे गुंतवण्यासाठी कोणताही एक ठराविक किंवा निश्चित काळ नसतो, तुम्ही कधीही सुरुवात करू शकता. मात्र, आजच्या तरुणांसाठी...

By: Team Navakal
SIP Investment Tips: वयाच्या 21 व्या वर्षी सुरू करा 'हा' प्लॅन, 30 वर्षांनंतर मिळतील 15 लाख
Social + WhatsApp CTA

SIP Investment Tips: पैसे गुंतवण्यासाठी कोणताही एक ठराविक किंवा निश्चित काळ नसतो, तुम्ही कधीही सुरुवात करू शकता. मात्र, आजच्या तरुणांसाठी २१ हे एक आदर्श वय मानले जाते. या वयात दरमहा 500 रुपये बाजूला काढणे फारसे कठीण नसते. जर तुम्ही विद्यार्थी असाल, तर घरून मिळणाऱ्या पॉकेट मनीमधून ही बचत करू शकता. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल, तर महिन्याच्या पगारातून छोटीशी रक्कम गुंतवणे सहज शक्य आहे.

तज्ज्ञांचा तरुण पिढीला काय आहे सल्ला?

येणारा काळ आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतो, त्यामुळे तरुणांनी नेहमी विचारपूर्वक आणि शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे, असा सल्ला आर्थिक क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे. तरुणांनी नेहमी त्यांच्या खर्चावर थोडे नियंत्रण ठेवून जितके शक्य असेल तितके पैसे वाचवून ते योग्य ठिकाणी गुंतवले पाहिजेत, जेणेकरून चक्रवाढ व्याजाच्या मदतीने पुढे जाऊन त्यांना मोठा फंड मिळू शकेल.

५०० रुपयांच्या बचतीचे थक्क करणारे गणित

समजा तुम्ही वयाच्या २१ व्या वर्षी कोणत्याही एका चांगल्या म्युच्युअल फंडामध्ये दरमहा ५०० रुपयांची एसआयपी (SIP) सुरू केली. दीर्घकालीन गुंतवणुकीवर सरासरी १२ टक्के परतावा मिळतो, असे गृहीत धरल्यास वयाच्या ५१ व्या वर्षी (म्हणजेच ३० वर्षांनंतर) तुमच्याकडे पुढीलप्रमाणे निधी जमा होईल:

  • तुमची एकूण गुंतवणूक: १,८०,००० रुपये
  • मिळालेला अंदाजित परतावा: १३,६०,४८७ रुपये
  • ३० वर्षांनंतर मिळणारी एकूण रक्कम: १५,४०,४८७ रुपये

या गणितावरून स्पष्ट होते की, २ लाख रुपयांपेक्षाही कमी असणारी तुमची गुंतवणूक ३० वर्षांमध्ये तब्बल १५ लाखांपेक्षा जास्त बनू शकते. गुंतवणुकीचा कालावधी जितका मोठा असेल, तितका चक्रवाढ व्याजाचा (कम्पाउंडिंग) फायदा जास्त मिळतो.

सुरुवात लहान करा, नंतर वाढवा मर्यादा

एसआयपीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही रक्कम भविष्यात वाढवू शकता. आज तुम्ही ५०० रुपयांनी सुरुवात केली तरी पुढे जसा तुमचा पगार वाढेल किंवा उत्पन्न वाढेल, तशी तुम्ही ही रक्कम दरमहा १,००० किंवा २,००० रुपये करू शकता. यामुळे भविष्यात जमा होणारा फंड आणखी मोठा असेल.

गुंतवणूक सुरू करण्यासाठी काय आवश्यक आहे?

गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही सेबी-रजिस्टर्ड (SEBI) कोणत्याही अधिकृत ब्रोकिंग अ‍ॅपचा वापर करू शकता. ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि डिजिटल स्वरूपात चालते. यासाठी तुमच्याकडे खालील गोष्टी असणे आवश्यक आहे:

  • पॅन कार्ड
  • ओळखपत्र (आयडी प्रूफ)
  • पत्त्याचा पुरावा (अ‍ॅड्रेस प्रूफ)
  • बँक खाते (बँक अकाउंट)
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी

हे देखील वाचा – Celebi Aviation Crisis: भारताने एका रात्रीत उद्ध्वस्त केले 500 दशलक्ष डॉलर्सचे साम्राज्य! पाकिस्तानला मदत करणे तुर्कीच्या कंपनीला पडले महाग

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या