अमरावतीत ठाकरेंच्या शिवसैनिकाची आत्महत्या! चिठ्ठीत ४ जणांचा उल्लेख

Former APMC Director Gopal Rane Dies by Suicide

अमरावती – अमरावती जिल्ह्यातील राठीनगरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक (Former APMC Director)आणि उबाठाच्या शिवसहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल बाबासाहेब राणे (Gopal Babasaheb Rane) यांनी आत्महत्या (suicide) केली. शेतावरील (farmland)अतिक्रमण आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (suicide note)४ जणांचा उल्लेख केला आहे. त्यांच्या शेतावर अतिक्रमण करून मानसिक त्रास (mental harassmen)दिल्याचा गंभीर आरोप या चिठ्ठीत केला आहे. या चिठ्ठीच्या आधारावर पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल (filed a case against the accused) केला आहे.

गोपाल राणे यांचे वय ५६ वर्षे होते.ते शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून अमरावती आणि राठी नगरमध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या शेतावर काही व्यक्तींनी बेकायदा अतिक्रमण केल्याने त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला, असे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. त्यांची पत्नी काल घराबाहेर गेल्यानंतर त्यांनी गळफास घेत आपले जीवन संपवले. याबाबत माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच मिळालेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. स्थानिक शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करत सरकारकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. राणे यांच्या आत्महत्येमुळे अमरावतीत हळहळ व्यक्त होत आहे.