Flipkart Sale 2025: बहुप्रतिक्षित Flipkart चा ‘बिग बिलियन डेज 2025’ सेल लवकरच सुरू होत आहे. 23 सप्टेंबरपासून या सेलमध्ये सर्व ग्राहकांसाठी धमाकेदार डील्स उपलब्ध असतील, तर फ्लिपकार्ट प्लस (Flipkart Plus) आणि ब्लॅक (Black) सदस्यांसाठी सेलची सुरुवात 22 सप्टेंबरपासूनच झाली आहे.
विशेषतः विद्यार्थी आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये रस असलेल्या ग्राहकांसाठी या सेलमध्ये 60,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत दमदार लॅपटॉपच्या डील्स उपलब्ध आहेत.
Flipkart Big Billion Days मध्ये खास लॅपटॉप डील्स
या सेलमध्ये 60,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत टॉप-नॉच फीचर्स असलेले तीन शानदार लॅपटॉप उपलब्ध आहेत:
ASUS Vivobook S14 (Snapdragon X Series): 92,990 रुपये किंमत असलेला हा 14-इंच डिस्प्ले असलेला लॅपटॉप Qualcomm Snapdragon X Series प्रोसेसरवर काम करतो आणि सेलमध्ये तो फक्त 58,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफरचा पर्यायही यावर देण्यात आला आहे.
ASUS Vivobook S14 (Intel 13th Gen): Dolby Atmos साउंड आणि Windows Hello फेशियल रिकग्निशनने सुसज्ज असलेला हा लॅपटॉप फक्त 1.40 kg वजनाचा आणि 1.59 cm पातळ आहे. कामासाठी, अभ्यासासाठी आणि मनोरंजनासाठी उत्कृष्ट असलेला हा लॅपटॉप सेलमध्ये 56,990 रुपयांमध्ये मिळेल.
Lenovo IdeaPad Slim 3x: मूळ 93,490 रुपये किंमत असलेला हा लॅपटॉप पॉवर, मोबिलिटी आणि इंटेलिजन्स यांचे उत्तम मिश्रण आहे. सेलदरम्यान हा लॅपटॉप फक्त 59,990 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.
हे देखील वाचा – Jacqueline Fernandez : मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनची कोर्टात धाव