Home / महाराष्ट्र / Sanjay Raut : ‘ते नार्वेकर नाही तर नॉर्वेकर ; संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर थेट पदावरूनच प्रहार..

Sanjay Raut : ‘ते नार्वेकर नाही तर नॉर्वेकर ; संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर थेट पदावरूनच प्रहार..

Sanjay Raut : राज्य विधिमंडळाच्या चालू अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी भाषेच्या उच्चारांवरून आणि वाचनशैलीवरून एक नवा राजकीय...

By: Team Navakal
Sanjay Raut
Social + WhatsApp CTA

Sanjay Raut : राज्य विधिमंडळाच्या चालू अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी भाषेच्या उच्चारांवरून आणि वाचनशैलीवरून एक नवा राजकीय व सामाजिक वाद निर्माण झाला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनानिमित्त विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला जात असताना, नार्वेकर यांनी केलेल्या मराठी वाचनावरून सोशल मीडियावर नेटिझन्सनी त्यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेत त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या संवेदनशील मुद्द्यावरून आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडू लागल्या आहेत.

राजकीय नेत्यांकडून तीव्र आक्षेप आणि टीका
विधानसभा अध्यक्षांच्या मराठी वाचनशैलीवर यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीरपणे आक्षेप घेत टीका केली होती. त्यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत या मुद्द्यावरून राहुल नार्वेकर यांच्यावर अत्यंत बोचरी आणि धारदार टीका केली आहे. महाराष्ट्रासारख्या मराठी भाषिक राज्याच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला मातृभाषेचे योग्य ज्ञान नसावे, याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

संजय राऊत यांचा उपरोधिक आणि आक्रमक हल्ला
पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले”विधानसभेच्या सर्वोच्च अध्यक्षपदावर विराजमान असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्रात राहून मराठी योग्य रीतीने बोलता येत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही आणि मुख्य म्हणजे मराठीत विचारही करता येत नाही, ही अत्यंत खेदजनक आणि गंभीर बाब आहे.”

यावेळी राऊत यांनी अध्यक्षांच्या आडनावाचा संदर्भ घेत अत्यंत उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले की, हे ‘नार्वेकर’ नसून ‘नॉर्वेकर’ असावेत. युरोपमधील ‘नॉर्वे’ या देशाशी त्यांचा काही कौटुंबिक किंवा भौगोलिक संबंध आहे का, याचा शोध घेण्याची वेळ आली असून, ते परकीय नागरिक तर नाहीत ना, अशी शंका घेण्याइतपत त्यांचे मराठीचे उच्चारण परके वाटते, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

शासनाच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पुढे बोलताना खासदार राऊत यांनी राज्य सरकारच्या मराठी भाषेविषयक धोरणांवर आणि भूमिकेवरही कडक शब्दांत बोट ठेवले. महाराष्ट्रात सर्व स्तरांवर मराठी भाषा अनिवार्य असल्याचे मुख्यमंत्री आणि शासन वारंवार सांगत असते. अगदी सामान्य रिक्षाचालकांना परवाना मिळवण्यासाठीही मराठी येणे सक्तीचे करण्याचे धोरण हे सरकार राबवते. परंतु, दुसरीकडे ज्या सरकारने विधानसभेचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी ज्या व्यक्तीची निवड केली आहे, त्यांनाच मराठी भाषेचे पुरसे ज्ञान नसावे आणि त्यांच्याकडून सभागृहात मराठीची थट्टा व्हावी, हा मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा घोर अपमान आहे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

पदच्युतीची आग्रही मागणी
मराठी भाषेचा असा अवमान करणारी आणि राज्याच्या संस्कृतीशी नाळ न जोडलेली व्यक्ती या सर्वोच्च घटनात्मक पदावर राहण्यास अजिबात पात्र नाही, असा आरोप करत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना तातडीने विधानसभा अध्यक्षपदावरून हटवण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या