Home / News / Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी ९ ऑक्टोबरला

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी ९ ऑक्टोबरला

Santosh Deshmukh Murder Case – बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात आज १५ वी सुनावणी...

By: Team Navakal
Santosh Deshmukh Murder Case

Santosh Deshmukh Murder Case – बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात आज १५ वी सुनावणी आयोजित होती. ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

पुढील सुनावणीत मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीबाबत निर्णय होणार आहे. तसेच वाल्मिक कराड वगळता आरोपी क्रमांक २ विष्णू चाटे यांच्यासह इतर आरोपींच्या दोषमुक्तीच्या अर्जावरही निकाल येणार आहे.

मागील सुनावणीत न्यायालयाने निकाल राखून ठेवत पुढील सुनावणीसाठी २४ सप्टेंबरची तारीख निश्चित केली होती, परंतु ती आता पुढे ढकलण्यात आली असून ९ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.


हे देखील वाचा –

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्या ! वांगचूक संतापले ! उपोषण सोडले

आयोगाच्या आधार लिंक सुविधेवर राहुल गांधींची टीकात्मक पोस्ट

नवरात्रीचे राजकीय’ रंग !  शिवसेना: रंग भगवाच, पण कशा बदलणार छटा?

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या