Home / महाराष्ट्र / Shirdi Saibaba : आंध्रातील भक्ताकडून साईचरणी १ कोटींचा सुवर्णहार अर्पण

Shirdi Saibaba : आंध्रातील भक्ताकडून साईचरणी १ कोटींचा सुवर्णहार अर्पण

Shirdi Saibaba – देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानपैकी एक असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात साईबाबांचा (Shirdi Saibaba) १०७ वा पुण्यतिथी उत्सव १...

By: Team Navakal
Shirdi Saibaba
Social + WhatsApp CTA

Shirdi Saibaba – देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानपैकी एक असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात साईबाबांचा (Shirdi Saibaba) १०७ वा पुण्यतिथी उत्सव १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान पार पडला. या पुण्यतिथी उत्सवाच्या सांगता दिनी आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) एका भाविकाने बाबांच्या चरणी तब्बल १ कोटींचा सोन्याचा हार (Gold necklace) अर्पण केला.

नाव गुप्त ठेवण्याची विनंती करत आंध्रप्रदेशातील या साईभक्ताने तब्बल ९४५ ग्रॅम वजनाचा हा सोन्याचा हार साईबाबांच्या चरणी अर्पण केला. हा सुवर्णहार अत्यंत आकर्षक नक्षीकाम केलेला असून तो नवरत्नांनी मढवलेला आहे. या हाराची बाजारपेठेतील किंमत तब्बल १ कोटी २ लाख ७४ हजार ५८० रुपये इतकी आहे. हा आकर्षक आणि मौल्यवान हार संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साईबाबांना अर्पण करण्यात आला.


हे देखील वाचा –

मारहाण प्रकरणी अनिल परब यांच्यावर आरोप निश्चिती

दार्जिलिंगमध्ये पूल कोसळून ७ मृत्यूमुखी

महाराष्ट्रात ई-बाँड प्रणाली लागू; आयात-निर्यात व्यवहारांसाठी पेपर बाँड्सचा वापर थांबणार, व्यापाराला गती

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या