Home / महाराष्ट्र / Pune ATS News : पुण्यात  ATS कडून छापेमारी.. पुण्यात दहशवादी नेटवर्क? २५ ठिकाणी  ATS कडून छापेमारी

Pune ATS News : पुण्यात  ATS कडून छापेमारी.. पुण्यात दहशवादी नेटवर्क? २५ ठिकाणी  ATS कडून छापेमारी

Pune ATS News : पुण्यातील(Pune) वाढती गुन्हेगारी आणि चोरांचा सुळसुळाट यामुळे पुण्यात तणावाचं वातावरण असत. पण आता पुणे दहशवाद्यांचा नवा...

By: Team Navakal
Pune ATS News

Pune ATS News :  पुण्यातील(Pune) वाढती गुन्हेगारी आणि चोरांचा सुळसुळाट यामुळे पुण्यात तणावाचं वातावरण असत. पण आता पुणे दहशवाद्यांचा नवा अड्डा बनत चाललं आहे का असा प्रश्न पडला आहे. पुणे शहरात काल रात्रीपासूनच मोठ्या घडामोडी घडत आहे. शहरामधील कोंढव्यासह अनेक भागांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. कोंढवा भागामध्ये ATS चे सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे देखील दिसून आले आहे. पुणे पोलीस (Pune Police) आणि एटीएसचे हे संयुक्त ऑपरेशन सुरु देखील सुरु आहे.

पुण्यातील कोंढवा भागात ATSचं जाळ पसरलं असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांसह हे संयुक्त सर्च ऑपरेशन राबवण्यात आल आहे. महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन राबवत आहेत. या सर्च ऑपरेशनदरम्यान एकूण १८ संशयितांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे. संशयितांनची चौकशी देखील सुरु आहे.

कोंढवा परिसरात दहशतवादी नेटवर्कबद्दल माहिती मिळाल्यावर, दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी या संभंधित काही ठिकाणी घापेमारी केली. अनेक संशयितांची चौकशी देखील करण्यात आली आणि काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले. रात्री उशिरापर्यंत हि घापेमारी सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यासगळ्या खळबळजनक प्रकारामुळे पुण्याच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.      


हे देखील वाचा –

Jio launches AI Classroom:  AI कोर्स शिका फुकटात; Jio चा भारतीयांसाठी नवीन प्लॅन! Jio मार्फत AI Classroom कोर्स!

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या